धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या 58 व्या वाढदिवसानिमित्त (दि. 31) धाराशिव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. वाढदिवस केवळ उत्सवाच्या स्वरूपात साजरा न करता सेवा आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून साजरा करण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.
धाराशिव येथील सिव्हिल हॉस्पिटलसमोर, मारवाड गल्ली परिसरातील अन्नपूर्ण छत्रालयात अन्नदान सेवा आयोजित करण्यात आली. गेल्या दहा वर्षांपासून अन्नपूर्ण छत्रालयाच्या माध्यमातून निस्वार्थपणे गरजू नागरिकांना भोजन उपलब्ध करून देण्याचे कार्य सुरू आहे. या सेवाभावी उपक्रमाला हातभार लावण्याच्या उद्देशाने हर्षवर्धनजी सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त धनंजय राऊत अध्यक्ष आणि धाराशिव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अन्नदान करण्यात आले.
या वेळी सिव्हिल हॉस्पिटलमधील रुग्ण, त्यांचे नातेवाईक तसेच गरजू नागरिकांना भोजनाचे वाटप करण्यात आले. गरजूंच्या सेवेत सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
तसेच, धाराशिव शहरालगत असलेल्या हातलादेवी डोंगरावर 200 झाडांची लागवड करण्यात आली.वृक्षलागवडीनंतर वृक्षांचे संवर्धन करण्याची जबाबदारीही स्वीकारण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला. पर्यावरणाचे संरक्षण, हरित क्षेत्र वाढविणे आणि भावी पिढ्यांसाठी निसर्गाचे संवर्धन करणे आवश्यक असल्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला. हर्षवर्धन सपकाळ यांच्या वाढदिवसानिमित्त धाराशिव जिल्ह्यातही विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. अन्नदान व वृक्षलागवड उपक्रमात धाराशिव शहर काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व काँग्रेसप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी झाले. यावेळी उपस्थितांनी हर्षवर्धन सपकाळ साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांच्या निरोगी, दीर्घायुषी व यशस्वी वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.
यावेळी शहराध्यक्ष धनंजय राऊत यांच्यासह राजेंद्र शेरखाने, प्रशांत पाटील, गोरोबा झेंडे, पोपट शिंदे, हरिदास शिंदे, बाबा मोमीन, संजय गजधने, अंकुश पेठे, अभिमान पेठे, आरेफ मुलानी, सरफराज काझी, अविनाश रणखांब, प्रेमानंद सपकाळ, अशोक बनसोडे, सय्यद मन्सूर, अवेदाबाई चव्हाण, सुरेश जगताप, सुरेंद्र पाटील, राजेंद्र राऊत, विश्वजीत बनसोडे, आकाश चव्हाण, चव्हाण तसेच धाराशिव शहर काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व काँग्रेसप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सेवा, सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वाढदिवस साजरा करण्याचा हा उपक्रम धाराशिव शहर काँग्रेस कमिटीच्या सामाजिक कार्याची प्रचिती देणारा ठरला.

