धाराशिव (प्रतिनिधी)- हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन, शिवसेनेचे मुख्य नेते तथा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार ओम राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत धाराशिव नगरपालिकेचे उध्दव ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक प्रदीप मुंडे, संतोष उर्फ नाना घाडगे, सोनाली अमित उंबरे, केसरबाई ज्ञानदेव करवर तसेच अमित उंबरे व ज्ञानदेव करवर यांनी शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते या सर्वांचा शिवसेना पक्षात अधिकृत प्रवेश संपन्न झाला. यावेळी सर्व सहकाऱ्यांचे शिवसेना परिवारात मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. जनसेवा, विकास आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सदैव कार्यरत राहण्याचा शिवसेनेचा विचार पुढे नेत धाराशिव शहरातील संघटन अधिक मजबूत करण्यासाठी नव्या सहकाऱ्यांच्या सहभागाचा निश्चितच मोठा हातभार लागेल. शिवसेनेत प्रवेश केलेल्या सर्व सहकाऱ्यांचे मनःपूर्वक स्वागत व पुढील सामाजिक आणि राजकीय वाटचालीस हार्दिक शुभेच्छा. यावेळी सूरज साळुंके, सोमनाथ गुरव, ऋषिकेश मगर, सह्यादी राजेनिंबाळकर, विश्वजीत गुरव उपस्थित होते.
