धाराशिव (प्रतिनिधी)- 8 फेब्रुवारी 2026 रोजी धाराशिवमध्ये “कॅन्सर अवेअरनेस” या संकल्पनेवर आयोजित करण्यात आलेली साडी वॉकेथॉन उत्स्फूर्त प्रतिसादात यशस्वीपणे पार पडली. याच जनजागृतीच्या शृंखलेतील पुढील महत्त्वपूर्ण उपक्रम म्हणून कॅन्सर डिटेक्शन कॅम्प आयोजित करण्यात आला आहे.
विवेकानंद रुग्णालय, लातूर यांच्या सहकार्याने विशेष कॅन्सर डिटेक्शन व्हॅन धाराशिवमध्ये येणार असून, या माध्यमातून 100 महिलांची कॅन्सर तपासणी करण्यात येणार आहे.
हा कॅम्प 22 ऑगस्ट 2026 रोजी डॉ. सुधीर मुळे यांच्या श्रेयश हॉस्पिटल, समर्थ नगर, धाराशिव येथे आयोजित करण्यात आला आहे. कॅम्पचे उद्घाटन सकाळी 10.30 वाजता होणार आहे. या उपक्रमाचे आयोजन ओस्ला (ओयासिस लेडीज फाउंडेशन), धारासुरमर्दिनी महिला फेडरेशन, आयएमए डॉक्टर्स वूमन्स विंग आणि रोटरी क्लब ऑफ धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. महिलांमध्ये कॅन्सरविषयी जागरूकता निर्माण करणे, वेळेवर तपासणीचे महत्त्व अधोरेखित करणे आणि लवकर निदानास प्रोत्साहन देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.