धाराशिव (प्रतिनिधी)- शिक्षणातुन मानवतावादी दृष्टीकोण विकसित होणे अपेक्षित असल्याचे प्रतिपादन  प्रा. राजा जगताप यांनी केले. येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव येथे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांचा 39 वा स्मृतीदिन साजरा करण्यात आला. यावेळी इंग्रजी विभाग प्रमुख डॉ सी.आर दापके यांच्या हस्ते शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. त्या प्रसंगी प्रा. जगताप बोलत होते. 

प्रा. जगताप पुढे बोलताना म्हणाले की, 

महात्मा गांधींच्या विचारांचा प्रभाव शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या व्यक्तीमत्वावर होणे स्वाभाविक होते. बापूजीनी सामाजिक जीवनातील प्रतिकुलता आणि विषमता जवळून अनुभवली होती. सदर प्रसंगी डॉ.सी.आर दापके यांनी ही शिक्षणमहर्षी डॉ बापूजी साळुंखे यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. या प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा माधव उगिले यांनी केले. तर आभार प्रा डॉ बालाजी गुंड यांनी मानले. सदर प्रसंगी अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे प्रमुख डॉ. मंगेश भोसले यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. के. मंजुळकर यांच्या मार्गदर्शनानुसार संपन्न झाला.

 
Top