तेर (प्रतिनिधी)- गोपाळवाडी येथे समृद्धी महिला ग्रामसंघ सर्वसाधारण सभा घेण्यात आली.
यावेळी कृषी व्यवस्थापक रोहिणी सुरवसे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व राष्ट्रमाता जिजाऊंच्या प्रतिमेचे पूजन करून प्रार्थना घेण्यात आली व गोपाळवाडी गावचे सरपंच संतोष थोरवे यांनी गावातील अडीअडचणी विषयी महिलांना मार्गदर्शन केले व उपाययोजना करण्याचा शब्द दिला तसेच ग्रामसेवक योगिता जमाले यांनी महिलांना ग्रामसभा व त्यांच्या अपेक्षा यावर चर्चा केली तसेच प्रभाग संघ अध्यक्ष सलीमुन पटेल यांनी ग्राम संघ बैठक त्यामध्ये होणाऱ्या व्यवहार व उपस्थिती याविषयी माहिती दिली. प्रभाग समन्वयक सुवर्ण पंडित यांनी व्यवसाय विषयी मार्गदर्शन करून उत्पादक गट परतफेड याविषयी माहिती दिली .प्रभाग संघ व्यवस्थापक साधना धाबेकर यांनी गटांचे ऑडिट करणे, कट ऑफ काढणे या संदर्भात सविस्तर चर्चा केली .कार्यक्रमाचे आभार समुदाय संसाधन व्यक्ती अश्विनी शेंडगे यांनी मानले. उपस्थित नैसर्गिक शेती अंतर्गत कृषी ताई सुजाता चव्हाण, सारिका शेंडगे व ग्राम संघाचे अध्यक्ष धनश्री मिसाळ, सचिव सविता जाधव, लिपिका नीता शेंडगे व गावातील सर्व महिला उपस्थित होत्या.
