तुळजापूर (प्रतिनिधी)-शहरातील सेवालाल चौक ते धाराशिव रोड उड्डाण पूल पर्यतचा रस्ता चौपदरीकरण करण्याची मागणी भाजपा गटनेते औदुंबर कदम यांनी 

उप विभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग, तुळजापूर. यांना निवेदन देऊन केली.

, तुळजापूर शहरात धाराशिव मार्गे व लातूर बायपास मार्गे येणारे सर्व वाहने या मार्गाने शहरात प्रवेश करतात परंतु तुळजापूर शहरातील सेवालाल चौक ते धाराशिव रोड उड्डाण पूल पर्यंतचा रस्ता अरुंद असल्याने सदरील मार्गावर या महिन्यामध्ये दोन अपघात होऊन प्रवाशांना व तुळजापूरातील नागरिकांचा जीव गमावला आहे. तसेच सदरील मार्गावर सतत लहान-मोठे अपघात झाल्याची सोशल मिडीयावर दिसत आहे.

तसेच दोन महिन्यानंतर आगामी शारदीय नवरात्र महोत्सव निमित्त श्री तुळजाभवानी देविजींच्या दर्शनाठी धाराशिव मार्गे मोठ्या प्रमाणात भाविक पायी चालत येत असतात परंतु सेवालाल चौक ते धाराशिव रोड उड्डाण पूल पर्यतचा रस्ता अरुंद असल्याने अपघात होण्याची शक्यता नाकारत येत नाही. तरी आपल्या कार्यालयामार्फत सेवालाल चौक ते धाराशिव रोड उड्डाण पूल पर्यंतचा रस्ता हा तात्काळ चौपदरीकरण करून विद्युत व्यवस्था करण्यात यावी. सदरील निवेदन गटनेते औदुंबर कदम नगरसेवक लखन पेंदे नगरसेवक दिनेश क्षीरसागर यांनी अभियंता आवाळे यांना दिली 


 
Top