धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव जिल्ह्याच्या विकासासोबतच जिल्ह्याच्या ऐतिहासिक,धार्मिक आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. पिंपळा खुर्द येथील श्री शंभू महादेव मंदिराला भविष्यात अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात,भाविकांची गैरसोय होऊ नये आणि या देवस्थानाची कीर्ती महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचावी,यासाठी आवश्यक ते सहकार्य करू अशी ग्वाही पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.

तुळजापूर तालुक्यातील पिंपळा खुर्द पिंपळा (खुर्द) ता.तुळजापूर येथील शंभू महादेव देवस्थान पिंपळा खुर्द येथील देवस्थानच्या नंदी आणि दीपस्तंभचे भूमिपजन सरनाईक यांच्या हस्ते झाले.यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष अर्चना पाटील, माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांच्यासह अन्य मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती होती. पालकमंत्री सरनाईक पुढे म्हणाले की, मंदिर परिसरात उभारल्या जाणाऱ्या दीपस्तंभामुळे केवळ मंदिर परिसर उजळणार नाही, तर आपल्या श्रद्धेचा प्रकाश पुढील अनेक पिढ्यांपर्यंत घेऊन जाईल.या मंदिराचा परिसर शोभनीय करू तसेच बारजचा पुनरुत्थान करण्यात येईल असे सांगितले. यावेळी पालकमंत्री सरनाईक यांनी मंदिराच्या विकासासाठी 11 लाख रुपये वैयक्तिक देणगीची घोषणा केली.

अर्चनाताई पाटील म्हणाल्या की, पालकमंत्री यांच्या माध्यमातून या गावाच्या विकासाला मदत होईल. 30 लाख रुपये मंदिर विकासासाठी जिल्हा परिषदेच्या तीर्थक्षेत्र विकासनिधीतून देण्यात येईल. येथील मंदिराला ब वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून दर्जा देण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे त्या म्हणाल्या. 

 
Top