भूम (प्रतिनिधी)- भूम तालुक्यातील 2 हजार लोकसंख्येचं गाव असलेल्या वंजारवाडीत थेट भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. निमित्त होते, गावातील रविंद्र चव्हाण यांचा विश्वासू कार्यकर्ता अक्की बर्वे यांच्या घराची वास्तूशांती. 

सोशल मीडिया स्टॅटिजी मेकर व सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेल्या अक्षय बर्वे यांच्या घराच्या वास्तूशांती कार्यक्रमासाठी भाजपा प्रदेशाध्यक्ष खास मुंबईतून वंजारवाडीत आले होते, तत्पूर्वी सोलापुरात पक्ष संघटनेची त्यांनी बैठक घेतली. अक्षय बर्वे यांची रविंद्र चव्हाण यांचा विश्वासू व एकनिष्ठ सर्वसामान्य कार्यकर्ता अशीच त्यांची ओळख. मात्र, एका सामान्य कार्यकर्त्याच्या घरी तेही वास्तूशांतीसाठी रविंद्र चव्हाण आल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. कारण, गोलाई चौकात मोठी गर्दी त्यांच्या स्वागताला होती. 12 जेसीबी आणि भला मोठा पुष्पहार, हलग्या आणि फटाक्यांच्या आतषबाजीत चव्हाण यांचे भूम नगरीत स्वागत झाले. 


आजचा दिवस सुवर्णक्षण 

आजचा दिवस माझ्या आयुष्यातील सुवर्णक्षण होता, जणू आज 'सूर्य' माझ्यासाठीच उगवला होता. रवि दादा आणि सचिन काकांचा विश्वास आणि प्रेम आयुष्यभर जपेन, त्यांची मान उंचावेल असेच कार्य सदैव करत राहिल, असे अक्षय बर्वे यांनी या दौऱ्यावेळी म्हटले. यावेळी रविंद्र चव्हाण यांचे विश्वासू सहकारी मित्र, डोंबिवली येथील उद्योजक सचिन बाबर, माजी विधानपरिषद आमदार सुजितसिंह ठाकूर, जय हनुमान ग्रुप अध्यक्ष श्री.सुरेशभाऊ कांबळे, भाजपा मराठवाडा संघटक श्री.नितीन काळे,भाजपा धाराशिव जिल्हाध्यक्ष श्री.दत्ता कुलकर्णी श्री.बाळासाहेब क्षीरसागर उपस्थित होते.


 
Top