धाराशिव (प्रतिनिधी )- मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवार (दि.1 ऑगस्ट )रोजी धाराशिव जिल्हाभर भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीला सकाळी 7:00 वाजता महाअभिषेक व महाआरती, शासकीय महाविद्यालय जवळील अन्नपूर्णा येथे मोफत अन्नदान, व रुग्णालयात फळे वाटप, छत्रपती शिवाजी महाराज चौक धाराशिव येथे 1000 वृक्षवाटप व रक्तदान शिबिर, विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाला सर्व मराठा सेवकव समाज बांधवांनी उपस्थित राहण्याचे आवाहन सकल मराठा समाज धाराशिवच्या वतीने करण्यात आले आहे.
.jpeg)
%20%E0%A4%9C%E0%A4%B0%E0%A4%BE%E0%A4%82%E0%A4%97%E0%A5%87%20%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%9F%E0%A5%80%E0%A4%B2%20.jpeg)