मुरुम (प्रतिनिधी)-भारत शिक्षण संस्था उमरगा श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ संजय अस्वले आणि संशोधक विद्यार्थी डॉ खंडू मुरळीकर यांच्या वाणिज्य संशोधन केंद्र आणि महाराष्ट्र राज्य उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आयोजित करिअर कट्टा, इन्क्युबेशन सेंटर अंतर्गत पेटंट डिझाईन सर्टिफिकेट मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष अमोल मोरे, सचिव पद्माकरराव हराळकर, सहसचिव डॉ सुभाष वाघमोडे, संचालक प्रा सुरेश दाजी बिराजदार, सुनील माने, दिगंबरराव बिराजदार यांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.
येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयात स्वातंत्र दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात यशस्वी आणि गुणवंतांचा सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. अस्वले यांच्या “AI-ENABLED ORGANIC AGRICULTURAL MARKETING MANAGING DEVICE”या डिझाईन पेटंट मुळे कृत्रिम बुद्धिमत्ताच्या मदतीने सेंद्रिय शेतीमालाच्या विपणनासाठी वापरता येणाऱ्या उपकरणाची रचना संरक्षित होईल तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीमालाची बाजारपेठ शोधणे, खरेदीदार निवडणे, उत्पादनाच्या विक्रीचे व्यवस्थापन, बाजारभावाच्या आधारे निर्णय घेण्यास मदत होणार आहे. असे प्रतिपादन प्राचार्य डॉ अस्वले यांनी केले.
महाविद्यालयाचे वाणिज्य संशोधन केंद्रात 22 संशोधक विद्यार्थी कार्यरत आहेत.
डॉ अस्वले यांचे कॉमर्स आणि मॅनेजमेंट शाखेतील एकूण 05 पेटंट आहेत. ग्राहक संबंध व्यवस्थापन, कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित साठा व्यवस्थापन व नियंत्रण उपकरण यांचा समावेश आहे. महाविद्यालयाचे वाणिज्य संशोधन केंद्रात त्यांच्या मार्गदर्शनाखाली 15 विद्यार्थी पी एच डी प्राप्त आहेत आणि 06 कार्यरत आहेत त्यामध्ये 04 आहेत, तसेच 21 विद्यार्थी एम फिल. आणि 06 एम. बी. ए. झाले आहेत. महाविद्यालयात संशोधन केंद्र आणि करिअर कट्टा अंतर्गत इन्क्युबेशन सेंटर, Start-up सेल च्या माध्यमातून पेटंट साठी महाविद्यालयीन प्राध्यापक आणि विद्यार्थी यानी पुढाकार घेतला आहे. याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
