धाराशिव (प्रतिनिधी)- सोलापूर येथे कळंब नगरपरिषदेतील ठाकरे गटाच्या 9 आणि काँग्रेसच्या 1 अशा एकूण 10 नगरसेवकांनी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार  रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपा परिवारात सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. याप्रसंगी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.  

उबाठा गटाचे गटनेते नगरसेवक संजय मुंदडा, जमील मंहमद कासीम खाटीक, इंदुमती जयनंदन हौसलमल, रुकसाना चाँदसाब बागवान, वनमाला शंकर वाघमारे, आशाताई सुधीर भवर, ज्योतीताई दीपक हाटकर, सफुरा शकील काझी, सागर सुभाष मुंडे, अर्चनाताई प्रताप मोरे यांनी भाजपात जाहीर प्रवेश केला. हा केवळ पक्षप्रवेश नाही, तर कळंबच्या विकासासाठी भाजपाच्या सक्षम नेतृत्वावर व्यक्त केलेला अढळ विश्वास आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकसित व आत्मनिर्भर भारताच्या संकल्पनेला आणि मुख्यमंत्री देवेंद्र  फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या वेगवान विकासाला बळ देण्यासाठी धाराशिव जिल्हा पूर्ण ताकदीनिशी भाजपाच्या पाठीशी उभा आहे, याचेच हे ठळक उदाहरण आहे.

भाजपा म्हणजे केवळ निवडणुकीपुरते राजकारण नव्हे; सर्वसामान्य नागरिकाला केंद्रबिंदू मानून विकास, सुशासन आणि लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देणारी विचारधारा आहे. याच कार्यपद्धतीवर विश्वास ठेवत विविध पक्षांतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी भाजपाशी जोडले जात आहेत. कळंबपासून धाराशिवपर्यंत भाजपाची संघटनशक्ती दिवसेंदिवस अधिक मजबूत होत आहे. प्रत्येक पदाधिकारी आणि कार्यकर्त्याच्या अथक परिश्रमातून उभी राहिलेली ही ताकद आगामी काळातील विकासाच्या नव्या पर्वाची नांदी आहे.

 
Top