धाराशिव (प्रतिनिधी)-  महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाच्या (एमएसआयडीसी) कारभाराची आमदार कैलास पाटील यांनी विधिमंडळ अधिवेशनात पोलखोल करीत गंभीर आरोप केले. धाराशिव येथील मेडिकल कॉलेज इमारतीच्या टेंडरमध्ये घोटाळा असल्याचा आरोप त्यांनी केला, कागदपत्रे मागवूनही ती खोटी दिली जाते. निवृत्त्त अधिकारी नको तुकाराम मुंडे सारखा अधिकारी द्या अशीच मागणी आमदार पाटील यांनी सरकारकडे केली.

यावेळी आमदार कैलास पाटील म्हणाले की,बार्शी ते धाराशिव हा रस्ता 10 मीटरचा तर धाराशिव बोरफळ औसा हा रस्ता 7 मीटरचा केला आहे, असा प्रकल्प बनवतात. ग्रामीण भागातील रस्त्याची अनेक कामे मंजुर असतानाही ती अपूर्ण आहेत. रोज अपघात होत असुन लोकांचे मृत्यू होत आहेत. लोक आंदोलन करीत आहेत. 43 हजार कोटींची मंजुरी देण्यात आली. मात्र प्रत्यक्षात 3 हजार कोटी मिळाले. बील मिळत नसल्याने कामे होत नसल्याचे ठेकेदार सांगतो. अशी स्थिती असताना दुसरीकडे महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळ (एमएसआयडीसी) कारभार अजब आहे. 

व्यवस्थापकीय संचालक दीक्षित नावाचे सेवानिवृत्त अधिकारी आहेत. सेवानिवृत्त अधिकारी यांना इथे का बसवले तर फक्त टेंडर मॅनेज करून द्यायचे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य असे तत्व असते. मात्र या विभागात जास्त टक्केवारी देणाऱ्यास प्राधान्य आहे. ठेकेदार याची कागदपत्रे खरी आहेत की खोटी यासह कोणत्याही कागदपत्राची पाहणी तपासणी केली जात नाही फक्त टक्केवारी हा निकष आहे. 


फेरनिविदा काढणार - छत्रपती शिवेंद्रराजे भोसले 

यावर उत्तर देताना इतर कामाची चौकशी करण्यात येईल, तसेच धाराशिव मेडिकल कॉलेजच्या कामाची निविदा प्रक्रिया नव्याने करू अशी माहिती छत्रपती शिवेंद्रराजे यांनी दिली.


 
Top