धाराशिव (प्रतिनिधी)- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसरात महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विद्यापीठ उपपरिसराचे संचालक प्रा. डॉ. रमेश चौगुले यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. उपस्थित सर्वांनी पुष्पहार अर्पण केला.
शेती व शेतकऱ्यांसाठी केलेल्या ऐतिहासिक कार्याचा गौरव म्हणून 1 जुलै हा दिवस कृषी दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. यावेळी जैवतंत्रज्ञान विभागप्रमुख डॉ. जितेंद्र कुलकर्णी, जल व भूमी व्यवस्थापन विभागप्रमुख डॉ. नितीन पाटील, प्रा. डॉ. गोविंद कोकणे, कक्ष अधिकारी विद्याधर गुरव, गणित विभागप्रमुख डॉ. राधाकृष्ण तिगोटे, डॉ. जितेंद्र शिंदे, श्रीकांत सोवितकर, वरिष्ठ सहाय्यक विश्वास कांबळे, सुधाकर राठोड, अशोक लोंढे, प्रल्हाद इंगळे, धनराज सोमवंशी, अमोल चव्हाण, अमित चव्हाण, इंद्रजित भालेकर, औदुंबर गाढवे, संदिप कांबळे, आदि उपस्थित होते.
