तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील इला येथील जीवन विकास विद्यालयाचे मुख्याध्यापक  प्रभाकर  घाटुळे हे  नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाले असून प्रशालेच्या वतीने त्यांचा सेवापुर्ती गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव अंबादास चौरे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे अध्यक्ष किसन चौरे, सरपंच पांडुरंग  पाटील ,राष्ट्रवादी शिक्षक संघाचे राज्याचे उपाध्यक्ष  बालाजी तांबे , काजळा केंद्राचे केंद्रप्रमुख गणेश खडके, बाळासाहेब घेवारे, हनुमंत  कोळपे,  दादासाहेब चौरे, अंकुशराव घुंडरे, विष्णू चौरे, हनुमंत नाईकनवरे, शिवाजी पानढवळे  उपस्थित होते .कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशालेचे सहशिक्षक  प्रशांत गरड  यांनी केले तर प्रस्ताविक  आनंद सोनटक्के यांनी केले यावेळी  दाउद पिंजरी, रामचंद्र चौरे, प्रशालेतील  शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी ग्रामस्थ, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top