तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर (ग्रामीण) येथील एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प कार्यालय (ग्रामिण) अंतर्गत विविध रिक्त जागेचे ग्रहण लागले आहे.

धाराशिव तालुक्यातील तेर येथे 52गावासाठी  एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प( ग्रामीण )कार्यालय कार्यान्वित करण्यात आलेले आहे. तेर (ग्रामीण) येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत 184 अंगणवाडी असून 5 पर्यवेक्षिकेची पदे रिक्त आहेत.त्यामध्ये कोंड, जागजी, ढोकी, खेड, उपळा(मा) येथील पदे रिक्त आहेत तसेच एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची बदली झाली असल्याने या कार्यालयाचा अतिरिक्त पदभार पर्यवेक्षिका यांच्याकडे देण्यात आलेला आहे.तेर येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालय अंतर्गत विविध रिक्त पदे असल्याने कार्यरत पर्यवेक्षिका यांच्याकडे विविध बिटचा अतिरिक्त पदभार दिल्यामुळे व कार्यालयीन कामकाजामुळे पर्यवेक्षिका यांच्यावर कामाचा प्रचंड ताण पडत आहे. पर्यवेक्षिका मनिषा पाटील यांच्याकडे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अधिकारी तसेच तेरसह कोंड व जागजी येथील बिटचा अतिरिक्त पदभार असून पर्यवेक्षिका के.पी.मोहीते यांच्याकडे येडशीसह ढोकी,खेड उपळा (मा) बिटचा अतिरिक्त पदभार आहे.शासनाने रिक्त असलेल्या पर्यवेक्षिका यांच्या जागा ताबडतोब भरण्याची मागणी होत आहे.


धाराशिव तालुक्यातील तेर येथील एकात्मिक बाल विकास प्रकल्प (ग्रामीण)कार्यालय अंतर्गत बाल प्रकल्प अधिकारी, 5 पर्यवेक्षिका  यांची पदे रिक्त असल्याने कामाचा प्रचंड ताण पडत आहे.

-मनिषा पाटील,प्रभारी एकात्मिक बाल विकास प्रकल्प (ग्रामीण ) कार्यालय,तेर)

 
Top