धाराशिव (प्रतिनिधी)-  अवैध गुटखा वाहतुक करणाऱ्यावर धाराशिव शहर पोलीसांनी कारवाई करून प्रतिबंधीत गुटखा 10 लाख 36 हजार 800 रूपयांचा व काळ्या रंगाची स्कॉरपिओ असा एकूण 25 लाख 36 हजार 800 रूपये किंमतीचा माल जप्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  धाराशिव शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक दराडे यांना गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, स्कॉर्पिओ वाहन क्र एमएच 25 बी.एफ. 3696 मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटख्याची वाहतुक होणार आहे. अशी खात्रीशीर माहिती मिळाल्यावरुन पोलीस ठाणे धाराशिव शहर पथकाने तेरणा इंजिनिअरींग कॉलेज समोर हायवेवर धाराशिव येथे छापा टाकला. स्कॉर्पिओ वाहन क्र. एमएच 25 बी.एफ.3696 मध्ये महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधीत केलेला गोवा गुटखा डायरेक्टर पान मसाला 40 गोण्या 1800 पॅकेट, प्रतिबंधीत तंबाखू आदी 1800 पॅकेट  एकुण 10 लाख 36 हजार 800 रूपये व काळ्या रंगाची स्कॉरपिओ गाडी क्र. एमएच 25 बी.एफ. 3696 असे एकुण 25 लाख 36 हजार 800 रूपये किंमतीचा माल मिळून आला. 

याप्रकरणी आरोपी गणेश मारुतीराव धुमाळ, वय 34 वर्षे, रा. उपळाई रोड एकता गणपती चौक बार्शी जि. सोलापूर, रोहन रविंद्र कदम रा. आळणी, जाफर जमादार रा. आळण राज्य कर्नाटक, अमोल गुंजाळ, पवन जिवन पौळ, रा. आळणी ता. जि. धाराशिव यांचे  विरुध्द पोलीस ठाणे धाराशिव शहर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कामगीरी पोलीस अधीक्षक  रितु खोखर, अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेशकुमार राउत यांचे मार्गदर्शनाखाली  धाराशिव शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक दराडे, पोलीस अमंलदार माळी, पोलीस अमंलदार जाधवर यांच्या पथकाने केली आहे.


 
Top