धाराशिव (प्रतिनिधी)- तालुक्यातील महाळंगी येथे दोन व्यक्तींनी वीट भट्टीसाठी अनाधिकृतपणे विना परवानगी, विना रॉयल्टी मातीचा साठा केला आहे. त्यामुळे याप्रकरणी संबंधितावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी धाराशिव येथील चंद्रकांत रंगनाथ काकडे यांनी एका निवेदनाद्वारे धाराशिव तहसिलदार यांच्याकडे केली आहे.