धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्रात विशेषत: मराठवाड्यात शेतकऱ्यांची अवस्था सध्या अत्यंत बिकट आहे. त्यातच दुष्काळसदृश्य परिस्थिती, शेतीमालाला नसलेला भाव व वाढत्या कर्जामुळे शेतकरी अक्षरशः उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे या आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी आता शेतकऱ्यांना पेरणीसाठी खते व बी बियाणे महाराष्ट्र सरकारने मोफत देण्याची मागणी समाजवादी नेते ॲड. रेवण भोसले यांनी केली आहे. 

पेरणीच्या तोंडावर वेळेत मोफत किंवा अनुदानित बियाणे व खते न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना नाईलाजाने सावकाराच्या दारात जावे लागते. शेतकऱ्याकडे पैसे नसल्यामुळे व पेरणीचा काळ निघून जात असल्यामुळे उद्भवणारी ही परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. शेतीची झालेली दैना, निसर्गाची अवकृपा, बाजारातील पडलेले भाव व डोक्यावर वाढलेला कर्जाचा डोंगर यामुळे आज शेतकरी सर्व बाजूंनी पुरता उध्वस्त झाला आहे. त्यामुळे अशा अत्यंत कठीण व संकटाच्या प्रसंगी महाराष्ट्र शासनाने राज्यातील आर्थिक संकटात सापडलेल्या सर्व शेतकऱ्यांना पेरणीसाठी खते व बी बियाणे मोफत देण्याची मागणी ॲड. भोसले यांनी केली आहे.

 
Top