तेर, (प्रतिनिधी)- रावे उपक्रमांतर्गत कृषी महाविद्यालय, आळणी (गडपाटी) येथील कृषिदूत विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पेठ तेर येथे स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त महाराष्ट्र कृषिदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी विद्यार्थ्यांनी गावातून वृक्षदिंडी काढून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला तसेच शाळा परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. विद्यार्थ्यांना महाराष्ट्र कृषिदिनाचे महत्त्व व स्व. वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील योगदानाची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमास श्रीम. पवार मॅडम, श्री. दराडे सर, श्री. गिरे सर, श्रीम. मते मॅडम, श्रीम. नाईक मॅडम, श्रीम. लोभे मॅडम, श्रीम. जगताप मॅडम, श्रीम. भिसे मॅडम, प्रा. शेटे सर, प्रा. माळी सर व प्रा. शिंदे सर उपस्थित होते.

तसेच कृषिदूत समर्थ पाटील, आनंद वीर, ज्ञानसागर पवार, स्वप्निल पासले, शिवम शेळके, रोहित पाटील, योगेश सवने, ऋषिकेश करडे आणि हर्ष वाघ यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विशेष परिश्रम घेतले.

 
Top