भुम (प्रतिनिधी)-  राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित अतुल दादा ठोंगे मित्रमंडळ यांच्या वतीने दिनांक 27 जून रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिंगणगाव (बुद्रुक) तालुका परांडा येथे विद्यार्थ्यांना शालेय शैक्षणिक साहित्य व विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना बक्षिसे वितरण कार्यक्रम संपन्न झाला. 

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना आपल्या शिक्षणात खंड पडू नये, शिक्षणासाठी मदत व्हावी म्हणून हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. 

राष्ट्रीय वाचन दिनानिमित घोषवाक्ये स्पर्धा व राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या, या स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांना सन्मानपत्र, शालेय शैक्षणिक साहित्य (वह्या पेन पेन्सिल इत्यादी) उद्योजक अतुल दादा ठोंगे यांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आले. याच कार्यक्रमात अतुल दादा ठोंगे मित्रमंडळ यांच्या वतीने शाळेच्या भौतिक सुविधा उपलब्ध करण्यासाठी रोख रक्कम 5100 रुपये व अजित पाटील यांच्या वतीने रोख रक्कम 5000 रुपये मुख्याध्यापकव्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. या कार्यक्रमात सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल ॲड ज्ञानेश्वर लोखंडे, नागेश औताडे, अजित नवले, अजित पाटील , ओंकार ठोंगे यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक शाहेदा हुसेनी या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून विषय तज्ञ (गटशिक्षण कार्यालय परांडा) अंकुश डांगे, शहाजी [पप्पु] ठोंगे, नानासाहेब कदम, प्रकाश भोसले, दत्ता ठोंगे, बाबासाहेब पाटील, संतोष बप्पा गोरे ,लक्ष्मण भिवरकर,लक्ष्मण ठोंगे अजित पाटील,हे होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक राहुल अंधारे यांनी केले तर आभार प्रदर्शन उज्वला बावकर यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी बाबासाहेब पाटील, सुदर्शन गोरे, धनाजी मारकड, दत्ता ठोंगे, दादासाहेब देवकते यांनी पुढाकार घेतला.


 
Top