धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा शेतकरी साखर कारखाना तेरणानगर लि.ढोकी च्या गेटवर सभासद व कर्मचाऱ्यांनी तेरणा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची मालमत्ता ही जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून अत्यंत कमी किमतीमध्ये कोणत्याही प्रकारची कायदेशीर पूर्तता न करता संचालक मंडळांनी विक्री केली आहे असा आरोप करीत. हैदराबाद येथून आलेल्या व्यापाऱ्यांच्या गाड्या आढवल्या आणि कारखान्याच्या गेट अधिकारीला गाड्या न सोडवण्यास निवेदन दिले आहे. सभासद-कर्मचाऱ्यांच्या मिळालेल्या माहितीनुसार सदरच्या भंगारची अंदाजीत किंमत दहा कोटी रुपये आहे. यामध्ये काही लोकांनी आर्थिक गैरव्यवहार करून सदरची भंगार पाच कोटी रुपये इतक्या नाममात्र किंमतीमध्ये हैदराबाद येथील एका व्यापाऱ्याला विक्री केला आहे.
जिल्हा बँकेकडून आवसायकास दरवर्षी मिळणाऱ्या उत्पन्नातून 25 टक्के रक्कम माजी कर्मचारी यांना उपलब्ध करून देण्याची तरतूद असताना मागील चार वर्षापासून एकही रुपये बँकेने दिलेला नाही. त्यामुळे कारखान्याच्या माजी कर्मचाऱ्यांचा थकीत वेतन, निवृत्तीवेतन, ग्रॅच्युइटी, शिल्लक पगार व इतर रकमा एकाही कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला नाही. त्यामुळे माझी कर्मचाऱ्यांची उपासमारीची वेळ आलेली आहे. अश्याप्रकारे माजी कर्मचाऱ्यांची अंदाजे 55 ते 60 कोटी थकीत रक्कम येणे आहे.
तात्काळ सदरची विक्री प्रक्रिया थांबवावी आणि टेंडर प्रक्रियेची वरिष्ठ अधिकाऱ्यांमार्फत चौकशी लावावी. चौकशी पूर्ण होईपर्यंत कारखान्यातून भंगारचा एकही तुकडा बाहेर जाऊ द्यायचा नाहीत. हैदराबादच्या व्यापाऱ्याचे 4 ट्रक कारखान्याच्या गेट समोर आलेले आहेत. सदरील प्रक्रिया थांबवण्यासाठी सभासद व कर्मचाऱ्यांकडून विरोध करण्यासाठी आंदोलन कारखाना गेटसमोर आंदोलन करण्यात येणार आले.
