धाराशिव (प्रतिनिधी)- रुईभर ता. धाराशिव येथील मठाधिपती भगवान गिरी (वय 92) यांचे मंगळवारी( दि 7 ) रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास वृद्धापकाळाने निधन झाले. बुधवारी दि 8 रोजी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास विविध महंत व मठाधिपती यांच्या उपस्थितीत मंत्रोच्चाराच्या जयघोषात त्यांच्या पार्थिवावर रुईभर येथील मठात दफनविधी करण्यात आला.
भगवान गिरी यांचे सामाजिक राजकीय तसेच विविध क्षेत्रात मोठे योगदान होते त्यांनी डॉ आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे उपाध्यक्षपद ही भुषविले होते यावेळी महंत श्याम चैतन्य महाराज माकणी महंत राजेंद्र गिरी महाराज देवताळा महंत मावजीनाथ योगी बाबाजी तुळजापूर महाराज तुळजापूर महंत व्यंकट महाराज तुळजापूर महंत घुमान गिरी महाराज एकंबी महंत गोपाळपुरी महाराज नागराळ महंत कृष्णानंद पुरी महंत मारुती महाराज हंताळ महंत कैलास गिरी महाराज चिंचोली काजळे मताधिपती म्हणून धनराज गिरी डॉ. आंबेडकर बाल विकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सुभाष (दादा) कोळगे माजी सरपंच पांडुरंग कोळगे ह भ प शिवाजी बारगुळे गुरुजी हभप जगन्नाथ महाराज गव्हाणे सदाशिव आप्पा कोळगे ह भ प काका महाराज सुर्यवंशी शिवाजीराव पवार त्र्यंबक जमदाडे मधुकर माने पोपट नलवडे सुब्राव लोमटे सुधाकर तिर्थकर यांच्यासह मोठ्या संख्येने महिलावर्ग रुईभर व परिसरातील नागरिक उपस्थित होते.
