कळंब (प्रतिनिधी)- कळंब तालुक्यातील शिराढोण येथील रहिवासी डॉ. धनराज कणसे यांचे सुपुत्र जयप्रकाश धनराज कणसे यांनी अखिल भारतीय पात्रता परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करून भारत सरकारच्या प्रतिष्ठित आयआयएम रोहतक (हरियाणा) या व्यवस्थापन संस्थेत प्रवेश निश्चित केला आहे. या उल्लेखनीय यशाबद्दल कळंब तालुका डॉक्टर असोसिएशनच्या वतीने डॉ. धनराज कणसे यांचा ओम बाल रुग्णालय, कळंब येथे मान्यवरांच्या हस्ते यथोचित सत्कार करण्यात आला.
या प्रसंगी कळंब तालुका डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. श्याम चौधरी, डॉ. अभिजीत जाधवर, डॉ. रमेश जाधवर, डॉ. कल्याणकर, डॉ. थळकरी, डॉ. राजेंद्र, डॉ. काकडे, डॉ. मनगिरे, डॉ. सचिन पवार, डॉ. शैलेश बिदादा, डॉ. सत्यप्रेम वारे, डॉ. निळकंठे, डॉ. चोपणे, डॉ. सुशीलकुमार, डॉ. ढेंगळे, डॉ. भगवंत जाधवर, डॉ. कणसे, डॉ. शेख, डॉ. देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.
