धाराशिव  (प्रतिनिधी)- धाराशिव शहरामध्ये एसआयआर चे फॉर्म वितरण करणे व मतदाराकडून फॉर्म भरून घेणे हि प्रक्रिया निवडणूक विभागाकडून राबविली जात आहे. या मध्ये बीएलओकडून संबंधित मतदाराच्या घरी जाऊन फॉर्म देणे व भरून घेणे हे बंधनकारक आहे.  जेणेकरून प्रत्यक्षात मतदारांची पडताळणी नियमाप्रमाणे होण्यास मदत होईल. परंतु धाराशिव शहरातील यादी भाग क्रमांक 333 मध्ये बीएलओ हे एका राजकीय पक्षाच्या कार्यालयात बसून एसआयआर चे काम करत असल्याचे निदर्शनास आले आहे. तश्या प्रकारच्या बातम्या वर्तमानपत्रात छापुन आल्या आहेत. तसेच समाजमाध्यमावर त्याचे व्हिडीओ प्रसिद्ध झाले आहेत. वास्तविक त्यांनी प्रत्येक घरी जाऊन नोंदणी करणे अपेक्षित आहे मात्र तसे दिसून येत नाही. निवडणूक आयोगाने दिलेल्या सुचनाचे पालन न करता एका राजकीय पक्षाच्या ऑफिस मध्ये बसून त्यांनी कर्तव्यात कसूर केले आहे. यामुळे चुकीची मतदार नोंदणी होऊ शकते त्यामुळे त्यांच्यावर योग्य ती कार्यवाही होणे आवश्यक आहे. असे निवेदन भारतीय जनता पार्टी, धाराशिव जिल्हा सरचिटणीस,ॲड. नितीन भोसले, ॲड. दत्तात्रय देवळकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. 


 
Top