धाराशिव (प्रतिनिधी)- येथील श्रीपतराव भोसले हायस्कूलचे सालाबादाप्रमाणे यावर्षी स्कॉलरशिप परीक्षेत 29  विदयार्थी गुणवत्ताधारक झाले  असून हे देदिप्यमान यश प्रशालेने प्राप्त केले आहे. इयत्ता आठवी स्कॉलरशिप मध्ये 218 पेक्षा अधिक गुण घेणारे  20 तर  पाचवीत 9 विद्यार्थी आहेत.

आठवीतून मयुरेश स्वामी 270 गुण घेऊन प्रशालेत  प्रथम आला. तर 262 गुण घेऊन द्वितीय क्रमांक सावंत सिद्धी हिने पटकावल. तर तृतीय क्रमांकावर कु . दळवे अक्षरा व थिटे सत्यम यांनी 260 गुण घेतले तर  चौथ्या  स्थानावर असलेल्या  कु.अर्पिता मुळे हिने 258 गुण घेतले. तर पाचव्या स्थानावर असलेल्या कु.मनस्वी इंगळे हिने 246 गुण , कुंभार सार्थक - 242 ,कदम प्रणव व पवार तेजश्री - 240 तानगे आकांक्षा व  लोमटे श्रेया - 238, चव्हाण सायली व जाधव सोहम - 236 , पवार रुद्र - 234 ,शेटे पुनीत व लांडगे वेदांत - 2 30 , जाधव सागर - 228 , कांबळे दृष्टी, उंबरे मुक्ता - 218, पवार हेरंब - 216 गुण प्राप्त करून यश मिळविले.

इयत्ता पाचवीमध्ये प्रथम क्रमांकावर कु.आरोही अर्जुने हिने 276गुण घेतले. तर द्वितीय क्रमांकावर  वाघमारे परिक्षित 252 गुण  तर तृतीय क्रमांकावर देशमुख समरजित 230 गुण  तर चौथ्या स्थानावर शिंदे आयुष याला 224 गुण तर  पाचव्या स्थानावर असलेला कवडे श्रीतेज 222 , पवार आरोही - 218, सावळे आदित्य व टेकाळ प्रसन्ना - 208, म्हेत्रे प्रणव - 205 गुण प्राप्त झाले.

या घवघवीत यथाबद्दल आदर्श आदर्श शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सुधीर पाटील, सचिव प्रेमाताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी आदित्य पाटील, प्राचार्य नंदकुमार नन्नवरे , उपप्राचार्य संतोष घार्गे ,पर्यवेक्षक तथा स्कॉलरशिप विभाग प्रमुख कुमार निकम, राजेंद्र जाधव,  बी. बी. गुंड, प्रवीण बागल, शेषनाथ वाघ , बालाजी गोरे ,के.टी पाटील फाउंडेशनचे पर्यवेक्षक शरद क्षीरसागर यांनी सर्व  विद्यार्थ्यांचे ,पालकांचे व संबंधित स्कॉलरशिपचे विषय शिकवणाऱ्या सर्व  शिक्षकांचे व पाचवी स्कॉलरशिप विभागाचे प्रमुख आर . बी .चौधरी तसेच लिपिक नवनाथ तांबारे यांचे अभिनंदन केले.


 
Top