तेर (प्रतिनिधी)-  धाराशिव तालुक्यातील तेर येथील स्टेट बॅक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी एम.के.झा यांचा उत्कृष्ट कार्याबद्दल जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

महाराष्ट्र शासनाची महत्वाकांक्षी असलेली मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम या योजनेअंतर्गत सन 2025-26 या वर्षात आपल्या बॅकेमाफत जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार युवक, युवतींना स्वयंरोजगार मिळवून देण्यासाठी उत्कृष्ट कामगिरी बजावल्याबद्दल तेर येथील स्टेट बँक ऑफ इंडियाचे शाखाधिकारी एम.के.झा यांना प्रशस्तीपत्र देऊन जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

 
Top