तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथून देहू ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्याचा प्रारंभ श्री संत गोरोबा काका यांच्या मंदिरात करण्यात आला.
तेर येथील श्री संत गोरोबा काका यांच्या मंदिरात दर्शन घेऊन देहू ते पंढरपूर आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पायी दिंडी सोहळा हभप दिपक महाराज खरात यांच्या संकल्पनेतून जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात प्रथमच सहभागी होण्याचा शुभारंभ करण्यात आला.यावेळी साहेबराव कदम, शिवाजी ढेकणे, राजाभाऊ आंधळे, रामहरी खांडेकर व मोठ्या संख्येने भाविकभक्त उपस्थित होते.
