धाराशिव (प्रतिनिधी)- प्रत्येक गावापर्यंत आणि खेड्यापर्यंत बस वेळेत बस पोहोचणे आवश्यक आहे. असे प्रतिपादन खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केले. राज्य परिवहनच्या धाराशिव विभागातर्फे आज 30 राजमाता जिजाऊ बसचे लोकार्पण खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
याप्रसंगी विभाग नियंत्रक अजय पाटील, यंत्र अभियंता रविराज घोगरे,आगार प्रमुख प्रवीण भोंडवे, विभागीय वाहतूक अधिकारी मथुरा जाधवर, संतोष कोष्टी, स्थानक प्रमुख मुकेश कोमटवार, सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक बालाजी बारते ,वाहतूक नियंत्रक याया काझी, सुरज पायाळ यासह एसटीचे अनेक कर्मचारी उपस्थित होते. आधुनिक सोयीसह थ्री बाय टू अशी आसन व्यवस्था असलेल्या या आरामदायी बसची 56 प्रवासी क्षमता आहे.
याप्रसंगी बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर यांनी काही कमी पडले किंवा बसची अडचण असेल तर पालकमंत्री तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी बोलून आणखी बसेस देण्याबाबत पाठपुरावा करू असेही त्यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे रवि कोरे आळणीकर, गजानन नलावडे, सोमनाथ गुरव, संजय उर्फ पप्पू मुंडे, अमित उंबरे, आदित्य पाटील, काका शिनगारे, गणेश जमाले, शिवयोगी चपने, भिमा अण्णा जाधव,प्रशांत साळुंखे, तात्या पडवळ, दादा घोडके यांच्यासह अनेक प्रवासी व नागरिक उपस्थित होते.
