धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे जनक स्व. वसंतराव नाईक यांच्या 113 वी जयंती विविध समाजोपयोगी उपक्रम राबवून दि.1 जुलै रोजी साजरी करण्यात आला.

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, हरित क्रांतीचे जनक यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज चौकात पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रम, वृक्षारोपण  रक्तदान शिबिर तसेच शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी 50 जणांनी रक्तदान केले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते नाईक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सामूहिक अभिवादन केले. या कार्यक्रमास समाजसेवक. डॉ. काकासाहेब राठोड, बालाजी राठोड, मोहन राठोड, विशाल जाधव, अरुण राठोड, युवराज राठोड, नितीन राठोड, वसंत राठोड, बाबू राठोड, रोहिदास आडे, महादेव पवार, शंकर राठोड, गणपत राठोड आदींसह पुरुष व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 
Top