तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर पंचायत समितीमध्ये परिचारक पदावर कार्यरत असलेल्या सौ. राधा राजकुमार जायभाय यांना लिपिक पदावर बढती मिळाल्याबद्दल प्रतीक्षा नगर परिसरातील नागरिक व महिला वर्गाच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी स्वाती गणेश बागल, गीतांजली किरण जाधव आणि पुनम बिबीशन लाटे यांच्या हस्ते राधा जायभाय यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमास इंदु शिवाजी राठोड, ज्योती चौधरी, सौ. उल्फा मोटे, विद्यासागर लोखंडे, भाऊसाहेब गीते, गजानन कांबळे, तुकाराम मोटे, राजकुमार जायभाय यांच्यासह प्रतीक्षा नगरातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
