तुळजापूर (प्रतिनिधी)- केंद्रीय ऊर्जा राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनी शनिवार दिनांक 18 जुलै रोजी तीर्थक्षेत्र तुळजापुरात येऊन तुळजाभवानी मातेचे मनोभावे दर्शन करून पूजा केली. तुळजाभवानीच्या दर्शनानंतर प्रदेश कार्यकारणी सदस्य गुलचंद व्यवहार यांच्या वतीने त्यांच्या हस्ते गोरगरीब 100 महिलांना साड्याचे वाटप करण्यात आले.
त्यावेळी माजी आमदार सुजितसिंहजी ठाकूर, जिल्हा अध्यक्ष दत्ता कुलकर्णी, माजी जिल्हा अध्यक्ष संताजी चालुक्य, अनिल काळे, जिल्हा उपाध्यक्ष शिवाजी बोधले, मंडल अध्यक्ष आनंद कंदले, गुलचंद व्यवहारे, बाळासाहेब भोसले, इंद्रजीत साळुंके, सागर पारडे, विकास मलबा, साहेबराव घुगे व कार्यकर्ते उपस्थित होते.
