धाराशिव (प्रतिनिधी)-  धाराशिव जिल्ह्यात एकदिलाने पक्षासाठी काम करण्याचे आवाहन करताना,  जिल्ह्यांत राबविण्यात आलेल्या यशस्वी आंदोलने, निवेदने, प्रशिक्षण शिबिरे आणि जनसंपर्क उपक्रमांचे कौतुक करण्यात आले. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे प्रदेश नेतृत्वाकडून विशेष अभिनंदन करण्यात आले.यावेळी धाराशिव जिल्हा काँग्रेसचे नूतन जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांनी अल्पावधीत संघटनात्मक पातळीवर केलेल्या उल्लेखनीय कामाची दखल घेत त्यांचा विशेष सत्कार  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष  हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून करण्यात आला.

छत्रपती संभाजीनगर येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाडा विभागातील जिल्हानिहाय काँग्रेस आढावा बैठक पार पडली.  बैठकीत धाराशिव जिल्ह्यातील संघटनात्मक कामकाजाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. जिल्ह्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनतेशी सातत्याने संपर्क ठेवण्यासाठी प्रभावी कनेक्ट सेंटर उभारण्यावर भर देण्यात आला. प्रत्येक पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या कामाची योग्य दखल घेतली जाईल, सर्वांना सोबत घेऊन काँग्रेस पक्ष अधिक सक्षम केला जाईल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला.

या आढावा बैठकीस धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष उमेश राजेनिंबाळकर, स्मिता शहापूरकर, पांडुरंग कुंभार,हनुमंत पवार,  राजाभाऊ शेरखाने, प्रशांत पाटील, आश्लेष मोरे, अझर पठाण,  खलील सय्यद,मेहबूबपाशा पटेल,अग्निवेश शिंदे ,धनंजय राऊत, ॲड. नुरोद्दीन चौधरी, विलास शाळू, आप्पासाहेब शेळके, ॲड.अरविंद बेडगे, ॲड. सिराज मोगल, दयानंद पाटील तसेच बैठकीला धाराशिव जिल्ह्यांचे पदाधिकारी, प्रदेश पदाधिकारी,कार्यकर्ते,  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 
Top