तुळजापूर (प्रतिनिधी)- स्वातंत्र्यसैनिक स्वामी रामानंद तीर्थ व गोविंदभाई श्रॉफ यांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या मराठवाडा जनता विकास परिषदेच्या तुळजापूर शहर व तालुका कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली आहे.

परिषदेच्या तालुकाध्यक्षपदी प्रा. धनंजय लोंढे यांची नियुक्ती करण्यात आली असून, तालुका उपाध्यक्षपदी विलास टोपे, सचिवपदी डॉ. अरविंद हंगरगेकर, सहसचिवपदी संभाजी बागल, तर कोषाध्यक्षपदी डॉ. सतीश ताकमोगे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच विविध पदांवर कार्यकारिणी सदस्यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली. तुळजापूर शहर कार्यकारिणीत उत्तमराव अमृतराव ॲड. अशोक जाधव, डॉ. आनंद मुळे, मुजाहिद शेख, गुरुराज डोंगरे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. ही नियुक्ती परिषदेचे सरचिटणीस प्रा. अर्जुन जाधव यांनी जाहीर केली. यावेळी परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे, उपाध्यक्ष प्राचार्य के. के. पाटील तसेच प्रमुख मार्गदर्शक डॉ. व्यंकटेश काळे यांनी सर्व नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून सामाजिक कार्य अधिक प्रभावीपणे राबविण्याचे आवाहन केले.


 
Top