धाराशिव (प्रतिनिधी)- तेरणा पब्लिक चॅरिटेबल ट्रस्ट संचलित अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विक्रमसिंह माने यांना प्लस 91 मीडिया व इंनोवेदा आयोजित एजुकेशन कोन्क्लेव्ह-2026 या उपक्रमांतर्गत प्राचार्य या पदावर कार्य करत असताना महाविद्यालयात राबिविलेल्या विविध नाविन्यपूर्ण विद्यार्थी कौशल्य विकास व सामाजिक क्षेत्रामध्ये महाविद्यालयातील तज्ञ प्राध्यापकांच्या मदतीने विद्यार्थ्यांकडून नाविन्यपूर्ण प्रोजेक्ट व अपडेटेड टेक्नॉलॉजी वर विद्यार्थ्यांकडून पूर्ण करून घेतलेले सर्टिफिकेशन्स यामुळे त्यांना दिनांक 18 जुलै 2026 रोजी “प्रिन्सिपल ऑफ द इयर अवॉर्ड -2026 हा पुरस्कार देऊन पुणे येथे गौरवण्यात आले.
डॉ. विक्रमसिंह व्ही. माने हे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालय,धाराशिव येथे प्राचार्य व डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ येथे कार्यकारी सदस्य म्हणून कार्यरत आहेत.त्यांचे 40 हून अधिक शोधनिबंध प्रतिष्ठित जर्नल्स, आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय परिषदांमध्ये प्रकाशित झाले आहेत. हा पुरस्कार मिळाल्याबद्दल विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष डॉ. पद्मसिंह पाटील, महाराष्ट्र शासनाच्या मित्रा संस्थेचे उपाध्यक्ष व संस्थेचे विश्वस्त आमदार राणाजगजितसिंह पाटील, विश्वस्त मल्हार पाटील, संस्थेचे व्यवस्थापकीय समन्वयक प्रा. गणेश भातलवंडे, सर्व विभागप्रमुख व विभागातील सर्व प्राध्यापकवृंद, विद्यार्थ्यांनी अभिनंदन केले.
