तेर (प्रतिनिधी)- धाराशिव तालुक्यातील तेर येथील समर्थ सचिन पवार यांने एप्रिल 2026 मध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत घवघवीत यश संपादन केल्याबद्दल  समर्थ पवार याचे अभिनंदन केले जात आहे. 

धाराशिव येथील ग्रीनलँड स्कूल मध्ये इयत्ता सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या तेर ता. धाराशिव येथील समर्थ सचिन पवार यांने शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय कामगिरी करत 234 गुण मिळवत शिष्यवृत्तीसाठी पात्र झाला आहे. यावेळी ग्रीनलँड स्कूलच्या संस्थापक स्वामी, वडील सचिन पवार आई ज्योती पवार यांच्यासह शिक्षणप्रेमी नागरिकांतून समर्थ पवार यांचे अभिनंदन केले जात आहे.

 
Top