परंडा (प्रतिनिधी)- वाढदिवसानिमित्त तालुक्यातील जि.प.प्रा.शा.काटेवाडी शाळेला वॉटर फिल्टरची भेट मंगळवार दि.14 जूलै 2026 आपला मुलगा आयांश याचा पहिला वाढदिवस सामाजिक कार्याने साजरा करण्याचा अनोखा उपक्रम प्रविण खाडे यांनी राबवला. त्यांच्या मुलाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्त काटेवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला आधुनिक वॉटर फिल्टर भेट देण्यात आला.

शाळेच्या प्रांगणात झालेल्या कार्यक्रमात प्रविण खाडे यांच्या हस्ते वॉटर फिल्टरचे उद्घाटन आणि केक कापण्यात आला. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊचेही वाटप करण्यात आले.  “वाढदिवस साजरा करताना समाजातील गरजू घटकांसाठी काहीतरी करावे अशी इच्छा होती. विद्यार्थ्यांना शुद्ध पाणी मिळावे हा यामागील उद्देश आहे,“असे प्रविण खाडे यांनी सांगितले.

उन्हाळ्यात शाळेतील 30हून अधिक विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्याची अडचण होती.या वॉटर फिल्टरमुळे आता त्यांना शुद्ध आणि थंड पाणी मिळणार आहे.

शाळेचे मुख्याध्यापक धोंडे सर यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा देत देणगीबद्दल आभार मानले. शिक्षक सुरवसे सर शाळा व्य.स.अध्यक्ष दयानंद खाडे, ग्रामस्थ विक्रम खाडे,पांडूरंग खाडे आणि विद्यार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरूवात साक्षी शिंदे इ.5 वी हीने स्वागतगीताने केली. प्रास्ताविक धोंडे सर यांनी केले.आभार सुरवसे सर यांनी व्यक्त केले.


 
Top