भूम (प्रतिनिधी)-  यशस्वी शेतीउद्योजक, सौर ऊर्जा व इंडक्शन खवा मशीनद्वारे खवा उत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे खवा क्लस्टर भूम एमएसएमई, ता. भूम, जि. धाराशिवचे विनोद जोगदंड यांना सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने राज्यस्तरीय कृषिरत्न पुरस्कार 2026 प्रदान करण्यात आला.

ग्रामीण भागातील उद्योगवाढ, कृषी क्षेत्रातील नाविन्यपूर्ण उपक्रम, स्थानिक रोजगारनिर्मिती आणि खवा उत्पादनाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याच्या कार्याची दखल घेत हा पुरस्कार देण्यात आला. भारतातील पहिला 100% ग्रीन खवा प्रकल्प उभारून खवा उद्योगाला पर्यावरणपूरक आणि आधुनिक दिशा देण्याचे काम खवा क्लस्टर भूममार्फत करण्यात आले आहे. सौर ऊर्जेचा वापर, इंडक्शन आधारित खवा मशीन, स्वच्छ व दर्जेदार उत्पादन प्रक्रिया आणि ग्रामीण भागातील उद्योजकतेला चालना देणारा हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी ठरत आहे. या कार्याबद्दल सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्याच्या पदाधिकाऱ्यांच्या हस्ते विनोद जोगदंड यांचा गौरव करण्यात आला.

 
Top