तुळजापूर (प्रतिनिधी)- तुळजापूर शिवसेना माजी तालुकाप्रमुख अमोल शिवाजीराव जाधव  यांनी भाविकांसाठी नव्या बसेसची मागणी केली होती त्याची दखल  परिवहन मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी घेवून तुळजापूर आगारासाठी पाच नवीन एसटी बस मंजूर केल्या असून, या बस लवकरच सेवेत दाखल होणार आहेत.

देवी दर्शणार्थ येणाऱ्या लाखो भक्तांच्या सोयीसाठी तुळजापूर आगाराला नवीन बसेस उपलब्ध करून द्याव्यात, ग्रामीण मार्गांवरील बसफेऱ्या वाढवाव्यात आणि यात्रा काळात विशेष बससेवा सुरू करावी, अशी मागणी जाधव यांनी  पालक तथा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे निवेदन देऊन केली होती  केली होती. या मागणीची तातडीने दखल घेत पाच नवीन एसटी बस मंजूर करण्यात आल्या आहेत. या निर्णयाबद्दल अमोल जाधव यांनी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आभार मानले आहेत. 

 
Top