परंडा (प्रतिनिधी) - धमराजिका महाविहार परंडा येथे तालुक्यातील अनुसूचित जाती समुहाची आरक्षण उपवर्गीकर अ, ब, क, ड विरोधात दिनांक मंगळवार दि.28 रोजी धाराशिव येथे होत असलेल्या मोर्चा संदर्भात परंडा तालुक्यातून हजारोच्या संख्येने हजर राहणे विषयी परंडा येथे बैठक घेण्यात आली.
यावेळेस उपस्थित रिपाईचे प्रदेश चिटणीस संजय कुमार बनसोडे, भारतीय बुद्ध महासभेचे माजी जिल्हाध्यक्ष तथा महाविहार समितीचे अध्यक्ष राजेंद्र कुमार निकाळजे, राष्ट्रवादी मागासवर्गीय सेलचे जिल्हा अध्यक्ष राहुल बनसोडे, नगरसेवक रत्नकांत शिंदे, वंचित जिल्हा नेते तानाजी बनसोडे, कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक विजयकुमार बनसोडे, रिपाईचे ज्येष्ठ नेते फकीर सुरवसे, तालुका अध्यक्ष रिपाइं दादा सरवदे, सोशल मीडिया आयटी सेल जिल्हाध्यक्ष आकाश बनसोडे, संजीवन भोसले, जयराम साळवे, भास्कर ओव्हाळ, बापू हावळे, उत्तम ओव्हाळ, दिपक ठोसर, विकास गोमासे, हरिभाऊ आढळे , रामा ओव्हाळ, दादा बगाडे, प्रितम ओवाळ, राम वाकचौरे, शाम गायकवाड, बाळु चतुर, दिपक गायकवाड, अनिल शिंदे, खंडू चाबुकस्वार ,विश्वास लोकरे, श्रावण गणगे, भारत धेंडे, वंचीतचे नेते धनंजय सोनटक्के, किशोर वाघचौरे, दादा वडतीले, दयानंद बनसोडे, ॲड. दयानंद धेंडे, विजय रणदील ,निळू बनसोडे, चंद्रपाल पालके, उमेश सोनवणे, नाना गोमासे, सचिन राऊत, अशोक खरात, बाबा गायकवाड, कानीफ सरपणे, बालाजी यशवद, तानाजी गोडखे आदी शेकडो समाज बांधव उपस्थित होते.
