धाराशिव (प्रतिनिधी)- रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव येथील रसायनशास्ञ विभागातील सहाय्यक प्रा,डॉ.गोविंद देविदास साळुंके यांना शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांचेकडून नुकतीच पीएच.डी.उच्य शिक्षणातील सर्वोच्य पदवी मिळाल्याबद्दल रामकृष्ण परमहंस महाविद्यालय धाराशिव येथे महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ.ए.के मंजुळकर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला .
यावेळी स्टाफ सेक्रेटरी प्रा.माधव उगीले, प्रो.डॉ.केशव क्षीरसागर,प्रो.डॉ.छाया दापके, विज्ञान विभागातील रसायनशास्ञ विभाग प्रमुख प्रा. डॉ. संदिप देशमुख,प्रा.डॉ.बाबासाहेब मोरे,प्रा.डॉ.मंगेश भोसले प्रा.डॉ.कुणाल वणंजे,प्रा.डॉ.हरिष कांबळे प्रा.स्वामी आदी प्राध्यापक उपस्थित होते. प्रा.डॉ.गोविंद देविदास साळुंके यांनी "Synthetic study of some nitrogen and oxygen containing heterocycles and their applications" या विषयावर शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथे आपले संशोधन करून पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. त्यांच्या संशोधनासाठी मार्गदर्शक म्हणून प्रा. डॉ. संदीप अशोक संकपाळ (रसायनशास्त्र विभाग, शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर) यांनी कार्य केले आहे. प्रा. डॉ. साळुंके यांचे स्वतःचे 3 आणि सह-लेखक म्हणून 3 असे एकूण 6 आंतरराष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध प्रकाशित झाले आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे रामकृष्ण परमहंस महाविद्यालय आणि धाराशिव जिल्ह्याचा गौरव वाढला आहे. त्यांच्या संशोधनाची चर्चा परिसरात होत आहे.
