धाराशिव (प्रतिनिधी)- हरित क्रांतीचे प्रणेते, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्व. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिनाच्या औचित्याने मुंबई येथील सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियममध्ये आयोजित राज्यस्तरीय कृषी पुरस्कार वितरण सोहळ्यात धाराशिव जिल्ह्यातील फनेपूर (ता. धाराशिव) येथील प्रतिभा रामराव काळे यांना कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल 'जिजामाता कृषी भूषण पुरस्कार' प्रदान करून गौरविण्यात आले.
हा पुरस्कार राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. या सोहळ्यास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार, कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती लाभली. धाराशिवच्या लेकीने आपल्या कर्तृत्वाच्या बळावर मिळविलेला हा राज्यस्तरीय सन्मान संपूर्ण जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब ठरली असून, कृषी क्षेत्रात कार्यरत महिला शेतकऱ्यांसाठी तो प्रेरणादायी ठरणार आहे. विशेष म्हणजे, पुरस्कारप्राप्त प्रतिभा रामराव काळे या भाजपचे मराठवाडा संयोजक नितीन काळे यांच्या मातोश्री आहेत.
