मुरुम (प्रतिनिधी)- वन महोत्सव सप्ताहाच्या निमित्ताने मुरुम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत वृक्षारोपणाचा उपक्रम राबविण्यात आला. सोमवारी दि. 6 जुलै रोजी उमरगा तालुक्यातील भुसणी येथील प्रतिभा निकेतन विद्यालयाच्या प्रांगणात पदाधिकाऱ्यांच्या आणि स्वयंसेवकांच्या उपस्थितीत विविध वृक्षांची लागवड करण्यात आली.
पर्यावरणाचे संवर्धन आणि वृक्षारोपणाचे महत्त्व समाजात रुजावे, या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात सहभागी मान्यवरांनी आणि विद्यार्थ्यांनी वृक्षारोपण करून निसर्ग संवर्धनाचा संकल्प केला. यावेळी सेवानिवृत्त शिक्षक विवेक जाधव व मुख्याध्यापक प्रेमनाथ आपचे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ. सुजित मटकरी, डॉ. रमेश आडे, डॉ. जयश्री सोमवंशी, डॉ. विलास खडके, प्रा. गोपाळ कुलकर्णी, लालअहमद जेवळे, दत्ता शेळके आदींच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. महाविद्यालयाचे प्रतिनिधी, शिक्षक, ग्रामस्थ, विद्यार्थी-विद्यार्थिनी उत्साहाने वृक्षारोपणाच्या कार्यात सहभागी झाले होते. या उपक्रमामुळे परिसरात आनंदाचे वातावरण असून, निसर्गप्रेमींकडून या उपक्रमाचे कौतुक होत आहे.
