परंडा (प्रतिनिधी)- धाराशिव जिल्हा सहकार बोर्डाच्या चेअरमनपदी निवड झालेले अभिलाष लोमटे, नवनिर्वाचित संचालक ओम नाईकवाडी यांनी परंडा येथे भाजपा संपर्क कार्यालयात भाजपा नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी त्यांचा ठाकूर यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या. 

जिल्ह्यातील 1958 साली स्थापन झालेल्या धाराशिव जिल्हा सहकार बोर्डाच्या आतापर्यंतच्या इतिहासात सर्वात तरूण चेअरमन होण्याचा मान अभिलाष लोमटे यांना मिळाला आहे. अभिलाष लोमटे हे सहकार भारतीचे धाराशिव जिल्हा महामंत्री व जिल्हा व्यापारी महासंघाचे व एकता परिवाराचे सचिव आहेत. धाराशिव जिल्हा सहकार बोर्ड ही संस्था जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे पदाधिकारी, संचालक, सभासद आणि कर्मचारी यांना शिक्षण आणि प्रशिक्षण देणारी प्रमुख मार्गदर्शक संस्था असून सहकार चळवळ अधिक बळकट आणि लोकाभिमुख करण्यासाठी कार्य करते. आपल्या कार्यकाळात जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात पारदर्शकता आणण्यासाठी सहकार क्षेत्रातील लोकप्रतिनिधींना गुणवत्तापूर्ण प्रशिक्षण देण्याचा मनोदय यावेळी झालेल्या चर्चेत अभिलाष लोमटे यांनी व्यक्त केला. 

यावेळी माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांनी चेअरमन अभिलाष लोमटे आणि संचालक ओम नाईकवाडी यांचा फेटा बांधून शाल व पुष्पहाराने सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भाजपा परंडा तालुका अध्यक्ष व बाजार समितीचे संचालक अरविंदबप्पा रगडे उपस्थित होते.

 
Top