धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्र ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने डेरवण जिल्हा रत्नागिरी येथे आयोजित राज्यस्तर ज्युनिअर गट(14,16,18,20 वर्षाखालील मुले/मुली) स्पर्धेसाठी धाराशिव(उस्मानाबाद) ज़िल्हा ॲथलेटिक्स संघटनेच्या वतीने जिल्हास्तर अजिंक्यपद स्पर्धा व जिल्हा संघाची निवड चाचणी(14,16,18,20) वर्षाखालील मुले/मुली श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम धाराशिव (उस्मानाबाद) येथे दि. 1 व 2 ऑगस्ट 2026 रोजी सकाळी 9:00 वा.आयोजित करण्यात आले आहे
खेळाडूंनी https://forms.gle/m6f6EATgjkNcKts48 या लिंक वर 27 जुलै 2026 पर्यंत नोंदणी करावी. यामध्ये ट्रायथलॉन A,ट्रायथलॉन B,ट्रायथलॉन C ,किड्स भाला,६०मी,१०० मी ,२०० मी, ४००मी ,६००मी,८००मी,१५००मी,५०००मी, गोळा फेक, लांब उडी ,उंच उडी, थाळी फेक ,भाला फेक,८०मी हर्डल्स,१०किमी चालणे, ४*१००मी रिले,४*४००मी रिले व इत्यादी या स्पर्धा होणार आहेत या स्पर्धेमधून विजयी खेळाडू मुले व मुलींची निवड धाराशिव(उस्मानाबाद) जिल्हा संघात केली जाणार आहे.खेळाडूंनी सोबत आधार कार्ड ,जल्म दाखला(नगरपालिका/ग्रामपंचायत), 2 पासपोर्ट साइज फोटो,10वी प्रमाणपत्र(सनद),AFI UID नंबर सोबत आणावे.यासाठी राजू सोलनकर यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत करण्यात आली आहे त्यामध्ये सदस्य म्हणून सुरेंद्र वाले, मुनीर शेख ,माऊली भुतेकर,संजय मडके,तानाजी लेंडवे, आश्विन पवार यांची तर राजेश बिलकुले यांच्या अध्यक्षतेखाली तांत्रिक समिती निवड करण्यात आली आहे त्यामध्ये सदस्य म्हणून सचिन पाटील,राहुल जाधव,रोहित सुरवसे,प्रशांत बोराडे,ऋषीकेश काळे,राहुल जाधव इत्यादी हे आहेत.स्पर्धा प्रमुख म्हणून श्री संजय कोथळीकर यांची निवड करण्यात आली आहे. यास्पर्धेत अधिकाधिक खेळाडुनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा संघटनेचे अध्यक्ष प्रा भरत जगताप व सचिव योगेश थोरबोले यांनी केले आहे . अधिक माहितीसाठी योगेश थोरबोले, रोहित सुरवसे, राजेंद्र सोलंकर, राजेश बिलकुले, सुरेंद्र वाले,राहुल जाधव यांच्याशी संपर्क साधवा .