परंडा (प्रतिनिधी)- परंडा तालुक्यातील अनाळा येथे जि. प.कृषी व पशुसंवर्धन विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना मका बियाणे गुरुवार दि.2 जुलै रोजी वाटप करण्यात आले.

अनाळा येथील पशुवैदयकिय दवाखान्यात सरपंच जोतीराम क्षिरसागर यांच्या हस्ते शेतक ऱ्यांना वैरण उत्पादक मका बियाणे वाटप करण्यात आले.तसेच कृषी दिना निमित्त दवाखाना परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली.  यावेळी पशुधन अधिकारी डॉ .विनोद मारकड, भाजपा तालुका उपाध्यक्ष हारीभाऊ शिंदे,भाजपा मिडीया सेलचे निशिकांत क्षिरसागर, ग्रा.प.सदस्य अजित शिंदे ,पत्रकार अलिम शेख, पशुवैद्यकीय दवाखाना कर्मचारी सुभाष औसरे,भारत राऊत,बाबु राऊत ,अविनाश देशमुख ,तात्यासाहेब चोबे,चंद्रकांत हिवरे,पंडित वारे,धर्मा शिंदे,भारत सातपुते ,लक्ष्मण सातपुते ,कानिफनाथ फराटे आजिनाथ शिंदे,श्रीमंत राऊत यांच्या सह शेतकरी उपस्थित होते.


 
Top