कळंब (प्रतिनिधी)- जगद्गुरू श्रीमद् रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज (दक्षिण पीठ, नाणीजधाम, रत्नागिरी) यांच्या पावन उपस्थितीत श्रीक्षेत्र सिमुरगव्हाण (ता. पाथरी, जि. परभणी) येथे दि. 6 ते 8 जुलै 2026 या कालावधीत तीन दिवसीय समस्या मार्गदर्शन, प्रवचन व दर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
दररोज सकाळी 9 वाजता कार्यक्रमास प्रारंभ होणार असून, भाविकांना जगद्गुरूंच्या मार्गदर्शनाचा, प्रवचनाचा तसेच दर्शनाचा लाभ घेण्याची सुवर्णसंधी उपलब्ध होणार आहे. दि. 6 जुलै रोजी साधक दीक्षा तर दि. 7 जुलै रोजी उपासक दीक्षा कार्यक्रम पार पडणार असून, इच्छुकांनी नावनोंदणी करून सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. जनसेवा, रक्तदान, वृक्षारोपण, मोफत रुग्णवाहिका सेवा, देहदान-अवयवदान, व्यसनमुक्ती, महिला सक्षमीकरण व शिक्षण क्षेत्रातील विविध उपक्रमांमुळे जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज संस्थान समाजोपयोगी कार्यासाठी विशेष ओळखले जाते.
या सोहळ्यास मराठवाडा उपपीठातील पदाधिकारी, कार्यकर्ते, साधक, शिष्य व भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रवचन व दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन पीठप्रमुख जयप्रकाश लोगारी, सहप्रमुख विजय देशपांडे, व्यवस्थापक सुरेश मोरे व मराठवाडा पीठ समितीच्या वतीने करण्यात आले आहे. कार्यक्रमाच्या तिन्ही दिवसांत भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.
