धाराशिव (प्रतिनिधी)- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री तथा हरितक्रांतीचे प्रणेते स्व.वसंतराव नाईक यांची जयंती जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, धाराशिव येथे उत्साहात साजरी करण्यात आली.

यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी हनुमान ढाकणे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते विजय गायकवाड यांच्या हस्ते स्व. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

प्रमुख पाहुणे विजय गायकवाड यांनी स्व.वसंतराव नाईक यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकताना सांगितले की, स्व. वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राच्या कृषी विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. शेती सिंचनाखाली आणण्यासाठी विविध जल प्रकल्पांची उभारणी केली तसेच त्यांच्या दूरदृष्टी नेतृत्वामुळे शेती, उद्योग आणि इतर अनेक क्षेत्रांमध्ये मोठे परिवर्तन घडून आले. यावेळी ग्रंथालयीन कर्मचारी शिवशंकर कटाळे, प्रफुल्लचंद्र राठोड तसेच स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी उपस्थित होते.

 
Top