तुळजापूर (प्रतिनिधी)- शहरातील कुंभार गल्लीतील एका दुकानास गुरुवारी दि. 2 जुलै रोजी सकाळी सहाच्या सुमारास आग लागुन आगीत मोठ्या प्रमाणात किराणा मालाच्या दुकानाचे साहित्य जळून खाक झाले जीवेत आणि मात्र झालेली नाही. सदरील आग मात्र नगरपरिषद अग्निशामक दलाने वेळेचा आग विजवल्याने जीवित हानी झाली नाही व आग आजूबाजूच्या घराकडे पसरली नाही.
याबाबत अधिक माहिती अशी की श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात विकास कामे चालू असल्याने सध्या बिडकर पायऱ्या वरून भाविकांना मंदिराच्या दर्शन मंडपात या रस्त्यावरन दर्शणार्थ जाता येत. विशेष म्हणजे या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणे असल्याने अग्निशामक दलाच्या वाहनालाही दूरवरूनच आगविजवावी लागले प्रथमता पावन लॉजपासून अर्धे आग विझवली. त्यानंतर बिडकर पायऱ्या व समोरून अग्निशामक दलाचे वाहन नेऊन उर्वरित अर्धी आग विझवली याआगीत किराणा मालाचे मोठ्या प्रमाणात दुकान झाले. भाविकांच्या वरदळीच्या रस्त्यावर असणाऱ्या दुकानात ही आग लागल्याने भाविकांच्या सुरक्षेचा अतिक्रमणाचा प्रश्न पुनश्चा ऐरणीवर आलेला आहे.
