परंडा (प्रतिनिधी)- परंडा तालुक्यातील रत्नापूर येथे वॉटर प्लॅन्टच्या कामाचे भूमीपुजन जेष्ठ नागरिक गोकुळ राऊत यांच्या हस्ते शुक्रवार दि.3 रोजी करण्यात आले.स्वयंम शिक्षण प्रयोग संस्था, एल आय सी प्रकल्प अंतर्गत ओ.एन.जी.सी.च्या सीएसआर फंडातून या प्रकल्पाची उभारणी स्वयंम शिक्षण संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नसीम शेख, परंडा तालुका समन्वयक शायदा मुजावर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या माध्यमातून परंडा तालुक्यातून रत्नापूर या गावाची निवड करण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे ग्रामस्थांना पिण्यासाठी स्वच्छ पाणी उपलब्ध होणार असून यासाठी ग्रा.प.चे सरपंच गवळण देवकर यांनी पुढाकार घेतला आहे. हा प्रकल्प उभारणीसाठी ग्रामपंचायतच्या लोकवाटातून पायाभरणी उभारणी केल्या नंतर याची जोडणी संस्थेच्या वतीने होणार आहे. या शुभारंभा प्रसंगी भाजपाचे श्रीराम देवकर, ग्रामसेवक बालाजी माडजे, मुख्याध्यापक सुतार, एलआयसी ट्रेनर नौशाद शेख, सखी शिला राऊत, बाबुराव जतकर,चेतन जतकर, गणेश जहागीरदार, दिपक शेंडगे, प्रशांत देवकर, गोकुळ राऊत, राजकुमार गादिया यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
