उमरगा (प्रतिनिधी)- “शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा “ हा मंत्र भारतीयांना देऊन संविधानाच्या माध्यमातून भारतीयांचे रक्षण केले. संविधानाच्या माध्यमातून भारतीयांना स्वाभिमानाने जगण्याचे शस्त्र दिले ही जाणीव ठेवून युवकांनी बाबासाहेबांचे विचार फक्त जयंती पुण्यतिथी मधून साजरी न करता आपल्या कृतीतून साकार करावे असे मत उपनगराध्यक्ष 'विजय वाघमारे ' यांनी व्यक्त केले. उमरगा येथील बहुजन हिताय वसतीगृहामध्ये उमेद स्वयंसहायता संस्था व पढाई से दोस्ती उपक्रमातर्फे वसतिगृहातील विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय उपयोगी साहित्याचे वितरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून विजय वाघमारे उपस्थीत होते. त्याचबरोबर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदर्श शिक्षिका शिल्पा बिराजदार उपस्थित होते. यावेळी प्रमूख पाहुणे म्हणून विश्वदीप फाउंडेशनचे अध्यक्ष प्रदीप मोरे, उपाध्यक्ष नितेश धुर्वे, नगरसेवक राहुल शिंदे, प्रथम फाऊंडेशन किल्लारीचे जिल्हा संपर्क अधिकारी सुमित कोथिंबीरे वसतिगृहाचे संचालक राजेंद्र सूरवसे, वगरसेनं कांबळे, पढाई से दोस्ती उपक्रमाच्या संचालिका सुजाता घोडके या उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे सूत्रसंचन व प्रास्ताविक वसतिगृहाचे अधीक्षक धम्मचारी प्रज्ञाजीत यांनी केले. तर आभार कमलाकर सूरवसे यांनी केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सपद्मिनी सूरवसे व यश वाघमारे तसेच सहकारी यांनी परिश्रम घेतले.
